Geography

Geography

भूगोल
https://mr.wikipedia.org/s/432
Jump to navigationJump to search
भूगोलाला इंग्रजीमध्ये Geography(जिओग्राफी) हा शब्द आहे. या शब्दाची उत्पत्ती ग्रीक भाषा शब्द –Ge किंवा Gaea या शब्दापासून झालेली आहे. या दोघांचा अर्थ Earth किंवा पृथ्वी असा होतो. graphein या शब्दाचा वर्णन करणे किंवा लिहिणे होतो. यो दोन शब्दांचा विचार केल्यास पृथ्वी आणि तिच्या वैशिष्ट्यांचा, पृथ्वीवरील जैवविविधतेचा आणि मानवी उत्क्रांतीचा आणि तिच्या कार्यांचा अभ्यास करणे हा भूगोलाचा उद्देश होईल. मराठीतला भूगोल हा शब्द संस्कृतमधून जसाच्या तसा घेतला आहे. भूगोल म्हणजे पृथ्वीचा गोल. हा शब्द भूगोलाचा अभ्यास या अर्थानेही वापरला जातो. भूगोलशास्त्रज्ञ चार पारंपरिक विचारांतून भूगोलाच्या अध्ययनावर भर देतात. त्यामध्ये
1.नैसर्गिक आणि मानवी क्रिया
2. भूवैशिष्ट्यांचा अभ्यास
3. मनुष्य आणि पृथ्वी यांचा सहसंबध आणि
4. भू-शास्त्र यांचा समावेश होतो. पारंपरिकदृष्ट्या भूगोल आणि भू-वैज्ञानिक यांना स्थळांच्या अभ्यासासंदर्भात एकाच वर्गात ठेवले जाते. जरी भू-वैज्ञानिक हे भू-शास्त्रामध्ये आणि नकाशातंत्रांत पारंगत असले तरी फक्त भौगोलिक नकाशे बनविणे एवढाच त्यांचा उद्देश नसतो; त्यांच्या अध्ययनात पृथ्वी व अवकाश यांच्या मानवाशी येण्याऱ्या संबधांचा अभ्यास करणे इत्यादींचा समावेश असतो. प्रत्येक क्षेत्राच्या प्रगतीत आर्थिक, वैद्यकीय सुविधा, हवामान, वनस्पती तसेच भूगोलाचे अध्ययन या सर्वांचा एकमेकांवर प्रभाव असतो. एखाद्या ठिकाणाचा फक्त अभ्यास करणे म्हणजे भूगोल नव्हे.आजचा जगतामध्ये भूगोल हा समाज आणि पर्यावरण यांना जोडण्याचे काम करत असलेले दिसुन येते .

अनुक्रमणिका
१ दोन मुख्य उपशाखा
२ भूगोलाचा इतिहास
३ संबधित क्षेत्र
४ भौगोलिक तंत्रज्ञान
५ = निवडक भू-वैज्ञानिकांची माहिती
५.१ बाह्य दुवे
दोन मुख्य उपशाखा
भूगोल हे शास्त्र असून त्याच्या मानवी भूगोल व भौतिक भूगोल अशा दोन मुख्य उपशाखा आहेत. उल्लेखिलेल्या दोन्ही उपशाखांमध्ये पर्यावरण आणि जीवावरण यांच्या निर्मितीचा अभ्यास होतो. यातील मानवी भूगोलाच्या उपशाखेचा मानवी दृष्टिकोनातून मानवाचा प्रभाव व मानवाचे पृथ्वीवरील महत्त्व यांचा अभ्यास करणे हा उद्देश आहे; तर भौतिक भूगोलाच्या उपशाखेत पर्यावरण, वातावरण, वनस्पती, जीवन, माती, जल आणि भूरचना हे सर्व कशाप्रकारे एकमेकांवर प्रभाव टाकतात यांचा अभ्यास केला जातो. या दोन्ही शाखांचा अभ्यास करतांना पर्यावरणीय भूगोल या तिसऱ्याच शाखेची निर्मिती झाली. या शाखेत या दोन्ही शाखांचा एकमेकांवर पडणाऱ्या प्रभावातून निसर्ग व मानवाचा संबध लक्षात येतो.

भूगोलाचा इतिहास
भूगोलाचे अध्ययन प्राचीन ग्रीक संस्कृतीमध्ये केलेले आढळते. ग्रीकांनी शास्त्र व तत्त्वज्ञान म्हणून भूगोलाचे अध्ययन केले आणि पृथ्वीचा आकार व तिची रचना कशी आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला. प्राचीन ग्रीक शास्त्रज्ञ अ‍ॅरिस्टॉटलने पृथ्वी गोल आहे असे सांगितले व इरॅथोसिसने पृथ्वीच्या परिघाचे मापन केले. रोमनांनी पृथ्वी हे विश्वाचे केंद्र आहे असे मानून नकाशेसुद्धा तयार केले. विश्वाला ३६० अंशांमध्ये विभागून अक्षांक्ष व रेखांशाची कल्पना मांडली.

मध्ययुगाच्या काळात रोमन संस्कृती लयाला गेली आणि भूगोलाची ज्ञानसंपदा युरोपकडून मुस्लिम जगाकडे आली. इद्रिसी (Idrisi), इब्न बतूत, (Ibn Batutta), इब्न खलादुन (Ibn Khaldun) यासारख्या वैज्ञानिकांनी त्यांच्या हाजींना ही माहिती भाषांतरित करून पुरविली. आणि नंतरच्या कालावधीत रोमन व ग्रीकांची सर्व साहित्यसंपदा अनेक शास्त्रज्ञांनी अनुवादित केली व बगदाद येथे विश्वविद्यालयाची स्थापना केली.

सोळाव्या व सतराव्या शतकांमध्ये क्रिस्तोफर कोलंबस, मार्को पोलो व जेम्स कूक यांनी पुष्कळ नवीन प्रदेशांचा शोध लावला. त्यांच्या अनुभवांवरून काही नकाशे नव्याने तयार करण्यात आले. अठराव्या व एकोणिसाव्या शतकांमध्ये भूगोलाला वेगळ्या अध्ययनशास्त्राचा दर्जा प्राप्त होऊन युरोपमधील प्रमुख विश्वविद्यालयांमध्ये भूगोलाचे अध्ययन होऊ लागले. यात प्रामुख्याने पॅरिस व बर्लिन विश्वविद्यालयांचा समावेश होता. अठराव्या शतकामध्ये भूगोलाच्या अभ्यासाकरिता अनेक भौगोलिक संस्था स्थापन करण्यात आल्या. त्यात १८२१ साली स्थापन झालेली Société de Géographie, १८३० साली स्थापन झालेली रॉयल जियोग्राफिकल सोसायटी, १८४५ साली स्थापन झालेली रशियन जियोग्राफिकल सोसायटी, १८८८ साली स्थापन झालेली नॅशनल जियोग्राफिक सोसायटी यांचा प्रामुख्याने समावेश होता. भूगोलाचा तत्त्वज्ञानाच्या शाखेपेक्षा विज्ञानाच्या शाखेशी संबध जोडण्यासाठी रिम्युल कान्ट, अलेक्झांडर वोन हुम्बोल्ट, कार्ल रिटर आणि पॉल विडाल डी ला ब्लैंचे यांनी योगदान दिले.

गेल्या दोन शतकांमध्ये संगणकाच्या नवशोधामुळे भूगोलाच्या अध्ययनात geomatics आणि इतर परिष्कृत पद्धतींचा वापर प्रभावीपणे होत आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये विसाव्या शतकापासून पर्यावरणीय सिद्धान्त, प्रादेशिक भूगोल, परिणामीय क्रांती (आंकड्याच्या साहाय्याने परिणाम-निश्चिती), समालोचनात्मक भूगोल अशा विविध मार्गांनी भूगोलाचे अध्ययन होत आहे. भूगर्भशास्त्र, वनस्पतीशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, जनसंख्याअध्ययनशास्त्र यांचा भूगोलाशी घनिष्ट असा आंतरसंबध आहे. आणि यामुळे भू-शास्त्राचे सर्वांगाने अध्ययन होण्यास मदत होत आहे.समाजाचा इतिहासाचा अभ्यास आणि समाजाला कोणत्या गोष्टीची गरज आहे हे पहिले जाते.

महाराष्ट्र राज्य:

महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली. स्थापनेच्या वेळी महाराष्ट्रात 26 जिल्हे, 235 तालुके, 4 प्रशासकीय विभाग होते.सध्यास्थितीत महाराष्ट्रात 36 जिल्हे, 355 तालुके, 535 शहरे, 43663 खेडी, 6 प्रशासकीय विभाग आहेत.
महाराष्ट्रातील 6 प्रशासकीय विभाग:

कोकण (30746 चौ.किमी): मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी/सिंधुदुर्ग.
पुणे/प.महाराष्ट्र (57268 चौ.किमी): पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर.
नाशिक/खान्देश (574426 चौ.किमी): नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार.
औरंगाबाद/मराठवाडा (64822 चौ.किमी): औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, लातूर, नांदेड.
अमरावती/प.विदर्भ (46090 चौ.किमी): अमरावती, बुलढाणा, अकोला, यवतमाळ, वाशिम.
नागपूर/पूर्व.विदर्भ (51336 चौ.किमी): नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया.
नैसर्गिक सीमा :

वायव्येस : सातमाळा डोंगररांगा, गाळणा टेकड्या व सातपुडा पर्वतातील अक्राणी टेकड्या.
उत्तरेस : सातपुडा पर्वतरांगा व त्याचा पूर्वेस गाविलगड टेकड्या.
ईशान्येस : दरेकासा टेकड्या.
पूर्वेस : चिरोळी टेकड्या व भामरागड डोंगर.
दक्षिणेस : हिरण्यकेशी नदी व कोकणातील तेरेखोल नदी.
पश्चिमेस : अरबी समुद्र.
राजकीय सीमा व सरहद्द :

वायव्येस : गुजरात व दादरा नगर हवेली.
उत्तरेस : मध्यप्रदेश.
पूर्वेस : छत्तीसगड.
आग्नेयेस : आंध्र प्रदेश.
दक्षिणेस : कर्नाटक व गोवा.
राज्य व त्यांना जोडणारे महाराष्ट्रातील जिल्हे :

गुजरात : पालघर, नाशिक, नंदुरबार, धुळे
दादर नगर हवेली : ठाणे, नाशिक
मध्ये प्रदेश : नंदुरबार, धुले, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपुर, भंडारा, गोंदिया
छत्तीसगड : गोंदिया, गडचिरोली
आंध्रप्रदेश : गडचिरोली, चंद्रपुर, यवतमाळ, नांदेड
गोवा : सिंधुदुर्ग
महाराष्ट्राचे भारतातील स्थान :

– भारतातील 29 राज्यांपैकी एक.
– भारताच्या मध्यवर्ती भागात .
– महाराष्ट्र राज्य ही उत्तर भारत व दक्षिण भारतात एकत्र आणणारी विशाल भूमी आहे .
1. विस्तार

अक्षांक : 15° 41’ उत्तर अक्षवृत्त ते 22° 6’ उत्तर अक्षवृत्त.
रेखांश : 72° 36’ पूर्व रेखांश ते 80° 54’ पूर्व रेखावृत्त.
2. आकार

व्हीव्हीत्रिकोणाकृती, दक्षिणेस चिंचोळा तर उत्तरेस रुंद.
पाया – कोकणात व निमुळते टोक विदर्भात.
3. लांबी, रुंदी व क्षेत्रफळ

लांबी = पूर्व – पश्चिम – 800 किमी.
रुंदी = दक्षिण – उत्तर – 720 किमी.
क्षेत्रफळ = 307713 चौ.किमी.
क्षेत्रफळाच्या द्रुष्टीने भारतात राजस्थान, मध्यप्रदेश नंतर महाराष्ट्रचा 3 रा क्रमांक लागतो.
महाराष्ट्राने देशाचा 9.36% भाग व्यापला आहे.
समुद्रकिनारा 720 किमी. लांबीचा आहे.
जिल्हे निर्मिती :

1 मे 1981 : रत्नागिरीपासून – सिंधुदुर्ग (27 वा जिल्हा)
औरंगाबादपासून – जालना (28 वा जिल्हा)
16 ऑगस्ट 1982 : उस्मानाबादपासून – लातूर (29 वा जिल्हा),
26 ऑगस्ट 1982 : चंद्रपूरपासून – गडचिरोली (30 वा जिल्हा)
1990 : मुंबईपासून – मुंबई उपनगर (31 वा जिल्हा)
1 जुलै 1998 : धुळेपासून – नंदुरबार (32 वा जिल्हा)
अकोल्यापासून – वाशिम (33 वा जिल्हा)
1 मे 1999 : परभणीपासून – हिंगोली (34 वा जिल्हा)
भंडारा – गोंदिया (35 वा जिल्हा)
1 ऑगस्ट 2014 : ठाण्यापासून – पालघर (36 वा जिल्हा)
Must Read (नक्की वाचा):
महाराष्ट्राची प्राकृतिक रचना
….
geograph – महाराष्ट्राची प्राकृतिक रचना (Maharashtra’s Natural Structure) Geography

महाराष्ट्राची प्राकृतिक रचना :

महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेचे तीन विभाग
1. कोकण किनारपट्टी
2. सह्याद्रि पर्वत / पश्चिम घाट
3. महाराष्ट्र पठार / दख्खन पठारी

1. कोकण किनारपट्टी :

स्थान: महराष्ट्र अरबी समुद्र व सह्याद्रि पर्वत यांच्या दरम्यान दक्षिणोत्तर लांब पट्टयास ‘कोकण’ म्हणतात.
विस्तार: उत्तरेस – दमानगंगा नदीपासून दक्षिणेस – तेरेखोल खाडीपर्यंत. कोकण किनारपट्टी ‘रिया’ प्रकारची आहे.
लांबी: दक्षिणोत्तर = 720 किमी, रुंदी = सरासरी 30 ते 60 किमी. उत्तर भागात ही रुंदी 90 ते 95 किमी. तर दक्षिण भागात ही रुंदी 40 ते 45 किमी.
क्षेत्रफळ: 30,394 चौ.किमी.

2. सह्याद्रि पर्वत / पश्चिम घाट :

स्थान: दख्खनच्या पठाराचा पश्चिमेकडील न खचलेला भाग म्हणजेच सह्याद्रि होय.
यामुळे सह्याद्रि पश्चिमेकडून अत्यंत उंच व सरल भिंतीसारखा दिसतो.
पठाराकडून मात्र अत्यंत मंद उताराचा दिसतो.सह्याद्रि पर्वत हा प्राचीन असून या पर्वताची बर्‍याच ठिकाणी झीज झाल्याने कमी – अधिक उंचीची ठिकाणे तयार झाली आहेत. उदा. शिखरे, घाट, डोंगर, उंचीवरील सपाट प्रदेश इ.

महाराष्ट्र पठार / दख्खन पठार / देश :

स्थान: महाराष्ट्र राज्यांपैकी एकूण क्षेत्रफळापैकी 90% क्षेत्र महाराष्ट्र पठाराणे व्यापले आहे.
लांबी-रुंदी: पूर्व- पश्चिम – 750km. उत्तर- दक्षिण – 700km.
ऊंची: 450 मीटर– या पठाराची ऊंची पश्चिमेस (600 मी) जास्त व पूर्वेस (300 मी) कमी आहे.
महाराष्ट्र पठार डोंगर रांगा व नद्या खोर्‍यांनी व्यापले आहे.
4.4 (87.78%) 18 votes