1857 च्या उठावानंतरचा काळ

1857 च्या उठावानंतरचा काळ

1857 च्या उठावानंतरचा काळ
By Sonali Borade On Jan 9, 2017
1 FacebookEmailTwitterGoogle+Pinterest
1857 च्या उठावानंतरचा काळ

भारताचा पहिला व्हॉईसरॉय लॉर्ड कॅनिंग झाला.
राणी एलिझाबेथच्या काळात स्थापन झालेल्या ईस्ट इंडिया कंपनीची 1857 साली राणी व्हिक्टोरियाच्या कारकिर्दीत इतिश्री (शेवट) झाला.
इ.स. 1860 मध्ये भारतीय संस्थानिकांना कॅनिंगने सनदा दिल्या.
इ.स. 1861 साली प्रत्येक प्रांतात पोलिस खाते निर्माण करून त्यावर इंस्पेक्टर जनरल यापदाची निर्मिती करण्यात आली.
1837 साली लॉर्ड मेकॉलेने तर केलेल्या ‘इंडियन पिनल कोड’ ला 1860 मध्ये मान्यता देण्यात आली.
इ.स. 1861 मध्ये ‘इंडियन हायकोर्ट अॅक्ट’ पारीत केला गेला व त्यान्वये मुंबई, चेन्नई व कोलकात्ता या शहरात उच्च न्यायालयांची स्थापना करण्यात आली.
‘चार्लस वुड’ ने सुचविलेल्या सुचनेनुसार लॉर्ड कॅनिंगने प्रत्येक प्रांतात शिक्षणखाते सुरू केले. तसेच मुंबई, चेन्नई व कोलकात्ता येथे विद्यापीठे स्थापन करण्यास प्रोत्साहन दिले.
इ.स. 1859 साली शेतकर्‍याविषयीचा ‘बंगाल रेंट अॅक्ट’ कॅनिंगच्या काळात करण्यात आला.
इ.स. 1860 मध्ये झालेल्या कृषक आंदोलनाच्या मूळ कारणांचे वर्णन ‘निल दर्पण’ या नाटकात केले. त्याचे इंग्रजी भाषांतर बंगालचा लेफ्टनंट ग्रांट याने केले.
लॉर्ड कॅनिंगची कारर्किर्द 1862 ला पूर्ण झाली. राणीने त्यास ‘अर्ल’ हा किताब बहाल केला.
इ.स. 1866-67 मध्ये ओरिसात दुष्काळ पडला होता त्याचे निर्मूलन करण्यासाठी ‘फॅमिना कमीशन’ ची नियुक्ती सर जॉन लॉरेन्स याने केली.
व्हाईसरॉय लॉर्ड मेयोने भारतात पहिल्यांदा आर्थिक विकेंद्रीकरणाची सुरुवात केली.
14 डिसेंबर 1870 रोजी एक ठराव पास करून त्यानुसार वित्तविकेंद्रीकरणाची योजना निश्चित करण्यात आली. या ठरावास ‘प्रांतीय स्वायत्तेची सनद’ असे मानण्यात येते.
लॉर्ड मेयोच्या काळात इ.स. 1872 मध्ये शिरगणतीचे (जणगणना) कार्य सुरू झाले.

1857 चा उठावाचे स्वरूप
By Sonali Borade On Jan 9, 2017
Share FacebookEmailTwitterGoogle+Pinterest
1857 चा उठावाचे स्वरूप

स्वातंत्र्य युद्ध – म्हणणारे व्यक्ती

वि.दा. सावरकर –

स्वधर्म रक्षणार्थ व राजकीय स्वातंत्र्यासाठी केलेले स्वातंत्र्य युद्ध होय.
संतोषकुमार रे –

हा उठाव म्हणजे लष्करी अथवा सरंजामी उद्रेक अथवा धार्मिक उद्रेकातून निश्चितपणे अधिक काहीतरी होता.
कर्नल मानसयन –

‘परिस्थितीने दाखवून दिले की, हिंदी समाजात व्देष भावना निर्माण करणारी अनेक कारणे होती हि कारणे वैयक्तिक नसून राष्ट्रीय स्वरूपाची होती’.
डॉ. एस.एन. सेन –

‘धर्मयुद्ध म्हणून सुरुवात झालेल्या घटनेने शेवटी स्वातंत्र्य युद्धाचे स्वरूप धरण केले.’

बंड म्हणणारे व्यक्ती

सर जॉन लॉरेन्स –

‘बंडाचे मुळ लष्करात होते. त्यांचे मूळ कारण काडतूस प्रकरण होते दुसरे तिसरे कोणतेच करण नव्हते’
सर जॉन सिले –

‘उठाव पूर्णत:देशप्रेम भावनारहित आणि स्वार्थाने प्रेरित शिपायांचे बंड होते ज्याचा कोणी नेता आणि जनपाठींबा नसणारे होते.’
न.र. फाटक –

‘शिपायांची भाऊगर्दी’
आर.सी. मुजूमदार –

इ.स. 1857 च्या उठावास राष्ट्रीय चळवळ म्हणता येणार नाही बंड करणारे नेते राष्ट्रीय भावनेने अपरिचित असलेले दिसतात.