राष्ट्रीय सभेची वाटचाल

राष्ट्रीय सभेची वाटचाल

राष्ट्रीय सभेची वाटचाल (1905-1920) भाग 2
By Sonali Borade On Jan 9, 2017
Share FacebookEmailTwitterGoogle+Pinterest
राष्ट्रीय सभेची वाटचाल (1905-1920) भाग 2

टिळकांनी स्थापन केलेल्या होमरूल लिगचे अध्यक्ष – बॅरिस्टर बॅप्टीस्टा तर सचिव : न.ची. केळकर
ब्रिटिश साम्राज्यांतर्गत वसाहतीच्या स्वराज्याची निर्मिती हे होमरूल चळवळीचे उद्दिष्ट होते.
होमरूल चळवळीमुळेच ब्रिटीश सरकारला ऑगस्ट 1917 मध्ये भारतात टप्या टप्याने वसाहतीचे स्वातंत्र्य देण्याबाबतची घोषणा करावी लागली.
अॅनी बेझंट यांनी ‘कॉमनविल’ हे साप्ताहिक व ‘न्यू इंडिया’ हे दैनिक सुरू केले.
1917 च्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून अॅनी बेझंट यांची निवड करण्यात आली.
1916 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने मुस्लीम लीगच्या स्वतंत्र मतदार संघास मान्यता दिली.
रौलेट अॅक्ट – राजद्रोह्यांना आळा घालण्यासाठी विनाचौकशी डांबून ठेवण्याचा अधिकार या कायद्यान्वये सरकारला मिळाला. हा कायदा 18 मार्च 1919 मध्ये पास झाला.
जालीयनवाला बाग हत्यांकांड- 13 एप्रिल 1919, रौलेट कायद्याचा निषेध व डॉ. किचलू आणि डॉ. सत्यपाल यांच्या अटकेचा निषेध करण्यासाठी अमृतसर येथे भरलेल्या सभेवर जनरल डायरने 1600 फैरी झाडल्या.
जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी सरकारने ऑक्टोबर 1919 मध्ये हंटर कमिशन नेमले.
खिलाफत चळवळ – 1919 (अलीबंधूंनी सुरू केली)
24 नोव्हेंबर 1919 रोजी दिल्ली येथे अखिल भारतीय खिलाफत परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषेदेचे अध्यक्ष माहात्मा गांधी होते.
तुर्कस्थानाच्या पाशाला पाठींबा दर्शविण्यासाठी ब्रिटिशाविरुद्ध एकत्र येऊन चळवळ करणार्‍या चळवळीस खिलाफत चळवळ म्हटले जाते.
20 फेब्रुवारी 1920 रोजी नागपूर येथे खिलाफत सभेचे खास अधिवेशन भरले. या अधिवेशनात असहकार चळवळीस पाठींबा दर्शविला.
1 ऑगस्ट 1920 ला असहकार चळवळ प्रारंभ करण्याची गांधीजींची घोषणा केली.