महानगरपालिका बद्दल संपूर्ण माहिती

महानगरपालिका बद्दल संपूर्ण माहिती

महानगरपालिका बद्दल संपूर्ण माहिती
By Shital Burkule Last updated Jun 22, 2018
Share FacebookEmailTwitterGoogle+Pinterest
महानगरपालिका बद्दल संपूर्ण माहिती

Must Read (नक्की वाचा):
नगरपरिषद-नगरपालिका बद्दल संपूर्ण माहिती

3 लाख किंवा त्यापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरी भागात महानगरपालिका अस्तित्वात येऊ शकते.
महानगरपालिकेच्या निवडणुका दर पाच वर्षानी होतात.
महानगरपालिकेच्या निवडून आलेल्या सदस्यापैकी एक महापौर तर एक उपमहापौर निवडला जातो.
महापौराचा कालावधी 2.5 वर्षाचा असतो.
महानगर पालिकेतील निवडून आलेल्या सदस्यांना ‘नगरसेवक’ म्हणतात.
महापौरास शहरातील प्रथम नागरिक असे संबोधतात.
महानगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख महानगरपालिका आयुक्त असतो.
आयुक्त हा भारतीय प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ सनदी अधिकारी असतो.
महानगरपालिका आयुक्ताची नेमणूक राज्यसरकार तीन वर्षासाठी करते.
महानगरपालिकेचे अंदाजपत्रक महानगरपालिका आयुक्त तयार करतो.
महानगरपालिकेच्या बैठकांना हजर राहण्याचा अधिकार आयुक्तांना असतो.
सध्या महाराष्ट्रात 26 महानगरपालिका आहेत.
पिंपरी चिंचवड ही महानगरपालिका देशातीलच नव्हे तर संपूर्ण आशिया खंडातील श्रीमंत महानगरपालिका गणली जाते.