पाणी शुद्धीकरणाबद्दल माहिती

पाणी शुद्धीकरणाबद्दल माहिती

पाणी शुद्धीकरणाबद्दल माहिती
By Dhanshri Patil Last updated Jun 22, 2018
Share FacebookEmailTwitterGoogle+Pinterest
पाणी शुद्धीकरणाबद्दल माहिती

Must Read (नक्की वाचा):
कुष्ठरोगाबद्दल संपूर्ण माहिती व उपाय

पृथ्वीवरील प्रमाण – पाणी 71%, जमीन 29%
71% पैकी फक्त 3% पाणीच पिण्यासाठी उपलब्ध.
माणसाच्या शरीर वजनाच्या 60% वजन हे पाण्याचे असते.
पेशी जिवंत ठेवणे, शरीरातील द्रवपदार्थांचे वहन, अन्नाचे चयापचय, शरीराचे तापमान थंड ठेवणे, उत्सर्जन ही पाण्याची प्रमुख कार्ये होत.
सुरक्षित पिण्याचे पाणी – पाण्यात रोगजंतू नसावेत. दिसण्यास स्वच्छ (रंगहीन, पारदर्शक, गढूळ नको) खारट नसावे, दुर्गंधी नको, बेचव नोको, अपायकारक घटक नको, रासायनिक प्रदुषकांपासून दूर असे पाणी असावे.
पाण्याचे मोजमाप :

गोल विहीरीचे सूत्र – व्यासाचा वर्ग हृ पाण्याची खोली हृ 785 = एकूण लीटर पाणी (सर्व मापे मीटरमध्ये)
चौकोनी विहीर/टाकीचे सूत्र – लांबी हृ रुंदी हृ पाण्याची खोली (ऊंची) हृ 1000 = एकूण लीटर पाणी (सर्व मापे मीटरमध्ये)
पाण्याचे शुद्धीकरण : 100 लीटर पाण्यासाठी 5 ग्रॅम T.C.L. पावडरचा वापर करणे.

T.C.L. पावडर :

लाँगफाँर्म – Troprical Chloride of lime
सूत्र – CaOCI2
सध्या TCL पावडरच सार्वजनिक पाणी शुद्धीकरणासाठी वापरली जाते.
टी.सी.एल. पावडरलाच ‘ब्लिचिंग पावडर’ असे म्हणतात.
TCL पावडरचे प्रकार :

ग्रेड – I – यात 36% क्लोरीनचे प्रमाण असते.
ग्रेड – II – यात 33% क्लोरीनचे प्रमाण असते.
नेहमी किमान 33% क्लोरीनयुक्त TCL पावडर पाणी शुद्धीकरणासाठी वापरतात. कमीतकमी 20% क्लोरीन असलेली पावडरसुद्धा चालते.
टेस्ट (चाचणी) :

लाँगफाँर्म – ऑथोर्टोल्युडीन
पाण्यामध्ये मुक्त क्लोरीन आहे किंवा नाही याची तपासणी करण्यासाठी करतात.
पाणी शुद्ध केल्यानंतर अर्ध्या तासाने O.T. घेण्यात यावी. (30 मिनिटे.)‍‍‌‌‌
पाण्यामध्ये 0.2 ते 0.5 पी.पी.एम. एवढी O.T. येणे आवश्यक असते.
TCL युक्त पाण्याची द्रावण टाकून चाचणी घेतली असता परीक्षा नळीतील पाण्याला ‘पिवळा रंग’ येतो.
पाण्यामध्ये TCL पावडर जास्त पडल्यास तपकिरी/लाल रंग येतो.
साधारण: पाण्यामध्ये 6 ते 8 तास O.T. टिकते.
हापशाचे शुद्धीकरण :

4 इंची व्यासाचा हापसा – 500 ml (1/2 लीटर) पाण्यात 150 ग्रॅम TCL पावडर घेऊन करतात.
6 इंची व्यासाचा हापसा – 1 लीटर पाण्यामध्ये 300 ग्रॅम TCL पावडर घेऊन करतात.
मदर सोल्यूशन (शाळेमर्फत वाटप) :

मदर सोल्यूशन (शाळेमार्फत वाटप) 1 लीटर पाण्यामध्ये 200 ग्रॅम TCL पावडर घेऊन करतात.