आहारशास्त्राविषयी संपूर्ण माहिती

आहारशास्त्राविषयी संपूर्ण माहिती

आहारशास्त्राविषयी संपूर्ण माहिती
By Dhanshri Patil Last updated Jun 22, 2018
Share FacebookEmailTwitterGoogle+Pinterest
आहारशास्त्राविषयी संपूर्ण माहिती

Must Read (नक्की वाचा):
वैज्ञानिक उपकरणे व त्यांचे उपयोग

समतोल आहार :

शरीरांची कार्यक्षमता व आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी पुरेशा प्रमाणात आणि परिमाणात वेगवेगळ्या अन्नपदार्थ्यांचा समावेश की ज्यातून स्निग्ध पदार्थ, कर्बोदके, प्रथिने, क्षार आणि जीवनसत्वे मिळतील असा आहार म्हणजे ‘समतोल आहार’ होय.
अन्नातील पोषक तत्वे/घटक :

स्थूल पोषक तत्वे – शरीरासाठी सर्वांत जास्त आवश्यकता. उदा. प्रथिने, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ (मेदपदार्थ)
सूक्ष्म पोषक तत्वे – अत्यंत कमी प्रमाणात (अल्प) आवश्यकता. उदा. जीवनसत्वे, क्षार.
अन्नपदार्थांचे वर्गीकरण :

प्राणीज (प्राण्यांपासून मिळणारे – अंडी, मांस, दुध)
वनस्पती (वनस्पतीपासून मिळणारे धान्य, फळे, भाज्या)
रासायनिक रचनेवरून –

प्रथिने
मेद पदार्थ
कर्बोदके
क्षार
जीवनसत्वे
प्रमुख कार्यावरून –

उर्जा / शक्तीचा पुरवठा करणारे अन्न
शारीरिक वाढ आणि दुरुस्तीसाठी आवश्यक अन्न
संरक्षण.
अन्नपोषक मुल्यांवरून –

एकदल धान्य
व्दिदल धान्य
हिरव्या पालेभाज्या
फळे
तेल/मेद
साखर गूळ
मसाले व तिखट
तेलबिया
इतर
प्रथिने (प्रोटीन्स) :

प्रथिने हि अमिनो आम्लांपासून बनलेली असतात.
शरीराला ’24’ अमिनो आम्लांची गरज असते.
त्यापैकी ‘9’ अमिनो आम्ले शरीरात निर्माण होऊ शकत नाहीत. ती आहारातून पुरवावी लागतात. म्हणून अशा अमिनो आम्लांना ‘आवश्यक अमिनो आम्ले’ असे म्हणतात.
(लायसीन, ल्युसीन, आयासोल्युसीन, व्हॅलिन, हिस्टीजीन, थ्रिओनिन, टिप्ट्रोफॅन, मिथिओनिन, फिनाईल, अॅलॅनिन)
अमिनो आम्ले ही कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर व कधी-कधी फॉस्फरस व लोह यांपासून बनलेली असतात.
प्रथिनांची कार्ये :

शरीराची वाढ आणि विकास करणे.
ऊतींच्या डागडुजीसाठी / दुरुस्तीसाठी.
प्रतिपिंडे (अॅंटीबॉडीज), विकरे (एन्झाइम्स), संप्रेरके (हामोन्स) यांच्या निर्मितीमध्ये.
रक्तनिर्मितीमध्ये.
कधी-कधी प्रथिनांपासून उर्जादेखील मिळते.
प्रथिनांची साधने :

प्राणीज साधने – दूध, अंडी, मांस, मासे.
वनस्पतीज साधने –
डाळी-तूर, मूग, हरभरा, उडीद, मसूर, सोयाबीन

धान्ये – ज्वारी, बाजारी, नाचणी, गहू.
तेलबिया – शेंगदाणे, तीळ, बदाम, करडई.
डाळींमध्ये प्रथिनांचे प्रमाण – 20-25% असते.
सोयबींमध्ये प्रथिनांचे प्रमाण – 43.2% (सर्वाधिक)
दुधामध्ये प्रथिनांचे प्रमाण- 3.2-4.3%
अंडी प्रथिनांचे प्रमाण – 13%
मासे प्रथिनांचे प्रमाण – 15-23%
मांस प्रथिनांचे प्रमाण – 18-26%
प्राणीज प्रथिने ही वनस्पतीज प्रथिनांपेक्षा ‘उच्च दर्जाचे’असतात. कारण त्यांच्यामध्ये सर्व आवश्यक अमिनो आम्ले उपलब्ध असतात.