अन्नपचन प्रक्रिया

अन्नपचन प्रक्रिया

अन्नपचन प्रक्रिया
By Shital Burkule Last updated Jun 22, 2018
Share FacebookEmailTwitterGoogle+Pinterest
अन्नपचन प्रक्रिया

Must Read (नक्की वाचा):
मिश्रणे व त्याचे प्रकार

सजीवाने अन्न ग्रहन केल्यापासून ते उत्सर्जित पदार्थ बाहेर टाकण्याच्या अवस्थेपर्यंत अन्नावर घडणार्‍या संपूर्ण प्रक्रियेला अन्नाची पचन क्रिया असे म्हणतात.
अन्न पचण्याची प्रक्रिया चालू असतांना त्या अन्नात या अवयवांकडून अनेक स्त्राव सोडले जातात.
या स्त्रावामध्ये विकरे, आम्ल, उत्प्रेरक, यांचा समावेश होते.
या स्त्रावामुळे अन्नातील जटिल घटकांचे सुलभ घटकात रूपांतर होते. ज्यामुळे अन्न पचण्यास सुलभ जाते.
खाल्लेले अन्न पचविण्याच्या क्रियेत खालील अवयवांचा महत्वाचा सहभाग असतो. अन्नपचनाची प्रक्रिया खालीलप्रकारे पाडली जाते.
1. अंग पदार्थ – मुख व गुहा

स्त्राव – लाळ
विकर – टायलिन
माध्यम – अल्पांशाने
मूळ अन्न पदार्थ – पिष्टमय पदार्थ
क्रिया आणि अंतिम – शर्करा (माल्टोज)
2. अंग पदार्थ – जठर

स्त्राव – हायड्रोक्लोरिक
माध्यम – आम्ल, अॅसिड
मूळ अन्न पदार्थ – प्रथिने
क्रिया आणि अंतिम – जंतुनाशक
3. अंग पदार्थ – जठररस

स्त्राव – पेप्सीन,रेनीन
माध्यम – आम्ल
मूळ अन्न पदार्थ – प्रथिने, दूध
क्रिया आणि अंतिम – सरल प्रथिने (पेप्टोन), व्हे मध्ये रूपांतर
4. अंग पदार्थ – लहान आतडे

स्त्राव – पित्तरस
माध्यम – अल्कली
मूळ अन्न पदार्थ – प्रथिने व मेद
क्रिया आणि अंतिम – मेदाचे विघटन व अन्न जंतूनाशक करणे.
5. अंग पदार्थ – स्वादुपिंडरस

विकर – ट्रिप्सीन, अमायलेझ, लायपेझ
माध्यम – अल्कली, अल्कली
मूळ अन्न पदार्थ – प्रथिने(पेप्टोन), पिष्टमय पदार्थ, मेद
क्रिया आणि अंतिम – अमिनोआम्ल, शर्करा व ग्लुकोज, मेदाम्ल व ग्लिसरॉल
6. अंग पदार्थ – आंत्ररस

विकर – इरेप्सीन, इनव्हरटेझ, लायपेझ
माध्यम – अल्कली
मूळ अन्न पदार्थ – प्रथिने, शर्करा, मेद
क्रिया आणि अंतिम – अमिनोआम्ल, ग्लुकोज, फ्रूटोज व माल्तैझ, मेदाम्ल व ग्लिसरॉल.